नांदुरा शहरातील ४१ तलवारी जप्तीच्या घटनेनंतर जिल्ह्यातील खामगाव शहरातही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री खामगावातील मेहबूब नगर चांदमारी घरकुल परिसरात पोलिसांनी छापा टाकून सात धारदार तलवारी जप्त केल्या. या कारवाईत आरोपी अब्दुल इमरान यांच्या घरातून सुमारे १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे केली. नांदुर्यात काही दिवसांपूर्वी शेख वसीम या आरोपीकडून तब्बल ४१ तलवारी आणि एकूण १.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर खामगावमधील कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याशिवाय, शेगाव शहरातही पोलिसांनी जमजम नगर व देशमुखपुरा परिसरातून चार तलवारी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. सलग कारवायांमुळे जिल्ह्यात शस्त्रसाठा कोणत्या उद्देशाने केला जात आहे याबाबत तपास सुरू आहे.
0 Comments