नांदुरा : शहरातील आत्मशक्ती गणेशोत्सव मंडळ वार्ड क्रमांक २ या वर्षी गणेशोत्सवात वेगळ्या पद्धतीने सामाजिक संदेश देत आहे. मंडळाने मंडपाभोवती ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर आधारित बॅनर लावले असून, हे बॅनर नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
या बॅनरमधून महिलांच्या सन्मान, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता आणि समाजात समानतेचा संदेश दिला जात आहे. भक्तगण दर्शनासाठी आल्यावर केवळ गणपती बाप्पाचे दर्शन घेत नाहीत, तर या बॅनरमधून समाजहिताचा विचार करण्यास प्रवृत्त होत आहेत.
मंडळाने सजावटीपेक्षा सामाजिक जाणिवेला प्राधान्य देत उपक्रम हाती घेतल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात समाजोपयोगी संदेश देण्याची ही एक आगळी-वेगळी पद्धत ठरत आहे.
- आत्मशक्ती गणेशोत्सव मंडळ, नांदुरा
0 Comments