गोरगरीब व कष्टकरी बहुजनांचे लोकनेते शिवचंद्र तायडे यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत – मराठा–बहुजन समाजाची मागणी

 (दि. २५ सप्टेंबर २०२५)

गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजाचे लोकनेते मा. शिवचंद्र तायडे व इतर तिघांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी जोरदार मागणी समाजबांधवांनी काल तहसिलदार, नांदुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, शिवचंद्र तायडे हे गेल्या २५ वर्षांपासून समाजकारण व जनहिताचे कार्य करत असून सर्व धर्म व सर्व समाजामध्ये विश्वास व आपुलकीचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले आहेत. परंतु त्यांच्या जनाधारामुळे व राजकीय दबावाखाली खोटे आरोप लावून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

समाजबांधवांनी म्हटले की, “लोकनेते शिवाभाऊ तायडे हे नेहमीच गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढले आहेत. एवढे असूनही त्यांच्या विरोधात खोटी अॅक्ट्रोसिटी दाखल करणे हा दुर्दैवी प्रकार आहे. त्यामुळे कार्यकर्ते व जनसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. काही अप्रिय घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ हे गुन्हे मागे घ्यावेत.”

या निवेदनात मराठा–बहुजन समाजासह विविध जातीय जनसामान्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. उपस्थितांनी एकमुखाने लोकनेते शिवाभाऊ यांना पाठिंबा जाहीर करत प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments