साखरखेर्डा नजीक शिंदी येथील ऋतुजा पद्माकर खरात या युवतीची खामगाव येथील जुगनू हॉटेलमध्ये तिच्या प्रियकराने, साहील उर्फ सोनू राजपूत (वय २२), चाकूने भोसकून हत्या केली. नंतरच सोनू राजपूतने देखील स्वतःला त्या चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली.
ही घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास खामगाव शहरातील जुगनू हॉटेलमध्ये घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. दोन्ही युवक-युवती साखरखेर्डा परिसरातील रहिवासी आहेत.
घटना पसरताच शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलिसांनी सुरुवातीला पत्रकारांना घटनास्थळी येऊ दिले नाही; त्यामुळे नेमकं काय घडले हे नागरिकांना लगेच समजले नाही. मात्र, पोलिसांच्या लक्षात आल्यावर तात्काळ पत्रकारांना सत्य माहिती पुरवण्यात आली. यामुळे अफवा रोखता आल्या आणि नागरिकांच्या गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. सुरुवातीला मृतक युवतीचे नाव पायल पवार अशी माहिती प्रसारित झाली होती, पण तपासात खरे नाव ऋतुजा खरात असल्याचे स्पष्ट झाले.
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील सोनू राजपूत व शिंदी येथील ऋतुजा खरात या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जुगनू हॉटेलमध्ये ते मागील काही महिन्यांमध्ये आठ वेळा थांबले होते, असे हॉटेलच्या रजिस्टरवरून कळते.
घटनेनंतर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, सहाय्यक पोलिस अधीक्षक लोढा आणि डीवायएसपी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आणि आवश्यक सूचनाही दिल्या.
या दुर्दैवी घटनेतील युवती ऋतुजा पद्माकर खरात खामगाव येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षात शिकत होती
0 Comments