मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीस इंजि. सचिन तायडे व सौ. कोमलताई तायडे यांचा एक महिन्याचा पगार
मलकापूर
राज्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटसमयी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत इंजि. सचिन तायडे यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्यामार्फत ६ ऑक्टोबर रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे यांची उपस्थिती होती.
राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन इंजि. तायडे म्हणाले,
"मी स्वतः ग्रामीण भागातील रहिवासी आहे. लहानपणापासून शेतकऱ्यांचे कष्ट आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचे होत असलेले नुकसान जवळून पाहिले आहे. देशाचा पोशिंदा संकटात असताना आपण त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या भावनेतून मी माझा एक महिन्याचा पगार मदतीसाठी अर्पण केला आहे."
या प्रसंगी त्यांच्या सोबत एस.के. स्क्वेअर एंटरप्रायझेसच्या संचालिका व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. कोमलताई तायडे उपस्थित होत्या.
संपादक :- लक्ष्मण कान्हेरकर मो : +91 90217 01875
0 Comments