नांदुरा ता प्रतिनिधी प्रकाश खंडागळे
नांदुरा : राज्य शासनाने यंदा दिव्यांग पेंशन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला ₹२५००/- पेंशन देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात काही लाभार्थ्यांच्या खात्यात पूर्ण ₹२५००/- रक्कम जमा झाली असताना काहींना केवळ ₹१५००/- इतकीच रक्कम मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.
या गोंधळामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, सणासुदीच्या काळात अचानक कमी झालेल्या पेंशनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या घोषणेप्रमाणे समान लाभ मिळावा, अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा तर्फे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन पाठवण्यात आले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना समान रक्कम म्हणजेच ₹२५००/- त्वरित जमा करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी उपस्थित होते —
(भागवत उगले) – मनसे तालुकाध्यक्ष,
(सागर जगदाळे) – मनसे शहर अध्यक्ष,
(निकेतन वाघमारे) – शहर उपप्रमुख,
(अमोल करूटले) – मनसे सैनिक
.
मनसेच्या माध्यमातून या प्रकरणात तातडीने कार्यवाही व्हावी आणि शासनाने सर्व लाभार्थ्यांना समान पेंशन देऊन न्याय द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली
0 Comments